Press "Enter" to skip to content

खंडोबा  देवस्थान चंपाषष्ठी उत्सवाची पालखी सोहळ्याने सांगता

सिटी बेल लाइव्ह । रोहा । नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के ।

रोहा शहरातील धनगर आळी येथील  श्री खंडोबा  देवस्थानच्या वतीने  कुलदैवत श्री खंडोबा देवाची चंपाषष्ठी उत्सव सोहोळा सांगता पालखी सोहळ्याने
मोठ्या उत्साहात करण्यात आली.
दि.१५ डिसेंबर २०२० रोजी श्री खंडोबा रायाची घटस्थापनेच्या पहिल्या पासून ते सहा दिवसांपर्यंत रविवार दिनांक २० डिसेंबर २०२०  पर्यंत चंपाषष्ठी उत्सव सोहोळा मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यातया आला.

प्रथम दिवशी मुख्य मंदिर आवारात पाखळणी हा विधी झाल्यानंतर उत्सव मूर्तींना नवीन पोशाख परिधान करून  बाळद्वारी येथे घटस्थापना होते श्री मल्हार मार्तंड आणि मणी मल्ल दैत्य यांचे सहा दिवस युद्ध झाले ते षडरात्र म्हणून साजरा केले जातात सहाव्या दिवशी मल्हारी मर्तांडांनी मणी मल्ल दैत्याचा संहार केला. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी शनिवारी शत तारका नक्षत्री देवलिंग रूपाने प्रगट झाले तोच हा चंपाषष्ठी दिवस या उत्सवनिमित्त समस्त पुजारी सेवेकरी भाविक वर्गाकडून गडाला गडकोट मंदिर आवाराला विद्युत रोषणाई व दररोज  श्री विजय मल्हारी महात्म्य वाचन विविध धार्मिक,अध्यात्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

तर मुख्य चंपाषष्ठी उत्सव दिवसी पूजा,अधिषेक,आदी धार्मिक विधी यथासांग पूजा पाठ करून घट उठविणे,पुरणपोळी,वांगे भरीत , रोडगा, कांद्याची पात यांचा नैवेद्य देवाला दाखविणे.संपूर्ण जेजुरी नगरीत घरा – घरात दिवटी पाजळले तसेच कोटंबा पूजन व तळी भांडार आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
 

कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने प्रचलित नियमाचे पालन करीत आपल्या कुलदैवत श्री खंडोबा रायांचे चंपाषष्ठी उत्सव सोहोळा रविवार दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी आप -आपल्या स्तरावर तत्परतेने प्रत्येक विश्वस्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देत फार मोठा गाजावाजा न करता मुख्य चंपाषष्ठी उत्सव दिवशी पालखी सोहळा फक्त खंडोबा मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून पुन्हा मंदिरामध्ये पालखी आणण्यात आली.असे धनगर आळी येथील श्री खंडोबा  देवस्थान समितीचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष प्रभाकर कानु पाडसे यांनी माहिती देताना सांगितले..
      

चंपाषष्ठी उत्सव सोहोळा यशस्वी रित्या पार पाडण्याकरिता श्री खंडोबा देवस्थान रोहे,विश्वस्त मंडळ अध्यक्ष प्रभाकर कानु पाडसे,उपाध्यक्ष हेमंत जनार्दन शेवाळे, दिपक कुरकुंडे,सचिव संजय कवितके, खजिनदार  विलास डफल,किशोर पाडसे,सदस्य मल्हार भांड,जालिंदर शेवाळे,सुनील भादेकर,राजेश विरकर, तानाजी भोजने,राजेश वारे,अमृत नारायण हुगे,संभाजी लाळगे,मिलिंद रायकर,,सल्लागार संतोष खटावकर, गोविंद कावितके,बाळकृष्ण पाडसे, ज्ञानेश्वर बारगीर,आदी उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत अशोक पाडसे,महिला सदस्य माधवी भादेकर,रेखा सचिन कुरकुंडे तसेच समस्त धनगर समाज ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ तरुण युवक मंडळ,अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.