Press "Enter" to skip to content

मुननाईट बारवरील 19 बारबालांवर पोलिसांची कारवाई

मुननाईट बारवरील 19 बारबालांवर पोलिसांची कारवाई

पनवेल, दि.20 (वार्ताहर)

पनवेल परिसरातील मुननाईट बारवरील 19 बारबालांवर पोलिस उपायुक्त परिमंडळ-2चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई केली आहे.           19 बारबाला उत्तान पेहराव्यात डिजे म्युजिकच्या तालावर बिभत्स हावभाव अंगविक्षेप करून गिऱ्हाईकांशी लगट करून त्यांना आकर्षित करण्याचे प्रकार काही बारमध्ये सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून परिमंडळ-2चेशिवराज पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी हुलगे, सपोनि राजेंद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, मनोज महाडिक व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन बारचे मॅनेजर, चालक, कॅशियर, डिजे ऑपरेटर, वेटर, स्टिवर्ड, गिऱ्हाईक यांनी आपसात संगनमत करून 19 बारबालांना बिभत्स हावभाव करण्यास प्रोत्साहन व परवानगी दिली. तसेच परवान्यातील अटी व शर्थींचे उलंघन केले. कोव्हिड-19 प्रादूर्भाव असताना त्याबाबत हईगईची व घातकी कृत्ये करून तसेच किळसवाणी व लज्जास्पद कृत्ये असल्याने त्यांच्याविरूद्ध पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून कारवाई कऱण्यात आली आहे. त्यामुळे इतर बारमालकांचे धाबे दणाणले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.