Press "Enter" to skip to content

एक्सप्रेस हायवे वर ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवेज सुरू

खालापूर टोलनाका येथे विशेष मोहिमे अंतर्गत जड-अवजड वाहनांवर कारवाई  


पनवेल, दि.20 (वार्ताहर)

भुषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती सुनिता साळुखे-ठाकरे, पोलीस अधिक्षक, मुख्यालय (वाहतुक), संजय बारकुंड, पोलिस अधिक्षक, महामार्ग पोलीस, रायगड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, महामार्ग पोलीस, पनवेल विभाग, सपोनि पुजारी, महामार्ग पोलीस केंद्र , पळस्पे यांचे वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर खालापुर टोल नाका याठिकाणी “ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवेज” ही मोहीम राबविण्यात येत आहे.       यामध्ये प्रवासी बसेस/जड/अवजड वाहनांनी डाव्या मार्गिकेचा वापर करावा, जी अवजड वाहने मधल्या किंवा पहिल्या मार्गिकेमधुन जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच वेगाने जाणा-या लहान वाहनांना डाव्या बाजुने ओव्हरटेकींग करावी लागते. त्यामुळे अपघात होतात. सदर अपघात टाळण्यासाठी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉटर नेमण्यात आलेले आहेत व त्यांचा एक व्हॉट्स अप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. तसेच कॅचर म्हणुन खालापुर टोल नाका याठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांना नेमण्यात आलेले आहेत. सदर स्पॉटरने लेन कटींग केलेल्या अवजड वाहनांचे कमांक व्हॉट्स अप ग्रुप वरती टाकण्यात आल्यानंतर खालापुर टोल नाका याठिकाणी कॅचर म्हणुन नेमलेले पोलीस अधिकारी / अंमलदार सदर अवजड वाहनांना ताब्यात घेवुन सदर अवजड वाहनाच्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून मोठया प्रमाणात प्रबोधन करण्यात येते व त्याबाबत समज वाहन मालकांना देखील फोनद्वारे दिली जाते. याव्यतिरिक्त महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे, मॉल्स तसेच मोठे ट्रान्सपोर्ट व लॉजिस्टीक याठिकाणी सकाळी व सायंकाळी वाहनांमधील पीए सिस्टीम द्वारे वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन तसेच वाहने बेदरकारपणे व बेशिस्तपणे न चालविण्याबाबत घोषणा दिल्या जातात. भुषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवेज या खालापुर टोल नाका विशेष मोहीमेला अचानक भेट देवुन मोहीम कशाप्रकारे चालवली जाते याची पाहणी केली व मोहीमेमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले तसेच सदर मोहीम प्रभावीपणे अंमलात आणणे व नियम तोडणा – या वाहन चालकांस कठोर दंडात्मक कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या.  सदर मोहीमेकरीता सपोनि शेवाळे, मसपोनि गौरी मोरे, पोउपनिरी मोरे, पोउपनिरी केसरकर हे ४ पोलीस अधिकारी व ५६ पोलीस अमलदार आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ३० कर्मचारी हे २४ तास ” ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवेज ” ही मोहीम राबविण्यात येत आहे अशी माहिती सुदाम पाचोरकर, पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस , पनवेल विभाग व सुभाष पुजारी, प्रभारी अधिकारी , महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे यांनी दिली. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.