Press "Enter" to skip to content

माथाडी कामगार नेते दिनेश घाग यांचा सवाल

जिल्ह्यतील संघटीत व असंघटीत कामगारांचा वाली कोण ?

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली चार महिने रायगड जिल्ह्यासह राज्यात लॉक डाऊन करण्यात आला आहे. सुरवातीच्या काळात आमच्या सर्व माथाडी कामगार वर्गाने व आम्हीही यासाठी शासनाला पुर्णपणे सहकार्य केले आहे. परंतू सद्य स्थितीत संपुर्ण कामगार वर्ग भयभित झाला आहे. यापुढेही जर असेच सुरु राहिले तर आपले कुटूंब कसे संभाळायचे या प्रश्नासह अनेक अडचणी कामगारांसमोर उभ्या आहेत. त्यामुळेच कामगारांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. कामगारांसमोर असलेल्या अनेक अडचणींसह सध्या सातत्याने मार्केट बंद राहत असल्यामुळे स्थानिक कामगारांना काम सुध्दा उरलेले नही. त्यातच महाराष्ट्र सरकार व जिल्हा अधिका-यांचे आदेश नसतानाही स्थनिक ग्रामपंचयती सुध्दा वारंवार मार्केट बंद ठेवत असते त्यामूळेही कामगार वर्गाला मोठ्या आर्थिक प्रमाणात फटका बसला आहे.

त्यामुळे यापुढेही जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर कामगारांच्या न्याय हक्का साठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल त्यासाठी कोणताही संघर्ष करावयास आम्ही तयार आहोत. तरीही विधानपरिषदेतील कोकणचे तरूण, तडफदार आमदार व सर्व प्रकारचे प्रश्न समजून घेणारे आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या सोबत याप्रकरणी लवकरच चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रोहा तालुका माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व तालुक्याचे कामगार नेते दिनेश घाग यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्री कु अदिती ताटकरे यांनी नागरिकांच्या हितासाठी रायगड जिल्ह्यात सध्या १० दिवसांसाठी घेतलेला लॉक डाऊनचा निर्णय योग्य असल्याचेही दिनेश घाग यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.