Press "Enter" to skip to content

शशिकांत मुंबरे यांना राज्यपालांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार प्रदान


सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

सुतारवाडी येथील रहिवासी तसेच प्रसिद्ध गायक व बालमोहन मराठी माध्यमाचे संगीत शिक्षक श्री शशिकांत मुंबरे यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रधान करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्यावतीने कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला. राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शशिकांत मुंबरे यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मुंबरे कोरोना काळात कोरोना काळात रुग्णांसाठी सेवाकार्याबद्दल व समाज माध्यमातून सांगीतिक कार्यक्रम केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

शशिकांत मुंबरे यांचे दूरदर्शन वर अनेक गायनाचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांना मिळालेला पुरस्कारा बद्दल सुतारवाडी सह पंचक्रोशिमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.