Press "Enter" to skip to content

कर्जत नगर परिषद हद्दीतील महावितरण कंपनीच्या कामास तांत्रिक मंजुरी

कर्जत मुख्य चौकात अडथळा ठरणारे पोल व ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या कामास सुरुवात

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने कर्जत नगर परिषद हद्दीतील महावितरण कंपनीचे एल. टी. पोल एच.टी.पोल तसेच ट्रान्सफॉर्मर हालविण्यासाठी महावितरण कंपनीची तांत्रिक मंजुरी मिळाली होती, कोव्हिड लॉक डाऊन मुळे हे काम झाले नव्हते, मात्र आता रस्त्यामध्ये वाहतुकीस अडथळा ठरणारे पोल तसेच ट्रान्सफॉर्मर ची जागा बदलण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.


रस्त्याच्या मध्यभागी असलेले पोल हटविल्याने आता स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चौक मोकळा झाला आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जुन्या छत्री केंद्रा जवळील इद्रुस व्हीला येथे असलेला महावीर पेठेचा धोकादायक 630 केव्ही चा ट्रान्सफार्मर हलविण्याची स्थानिक नागरिकांची बरे दिवसांची मागणी होती त्यासाठी सुवर्णा जोशी नगरसेविका असताना त्यांनी महावितरण कार्यालयाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता तसेच महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळेसमोरील ट्रान्स फार्मर हलविण्यासाठी शालेय व्यवस्थानाची आणि स्थानिक रहिवाशांची मागणी होती. त्याचप्रमाणे रस्ता रुंदीकरणात बाधित झालेले एल. टी. पोल एच.टी.पोल, ट्रान्सफार्मर हलविणे देखील जरुरीचे होते या सर्व बाबींचा विचार करून नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी महावितरण अधीक्षक अभियंता पेण मंडळ आणि उपकार्यकारी अभियंता कर्जत उपविभाग यांच्याशी पत्रव्यवहार करून आणि दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करून सदर विविध कामांची तांत्रिक मंजुरी मिळवली होती, मात्र कोव्हिड लॉक डाऊन झाल्यामुळे पुढील कामास चालना मिळाली नव्हती, लॉक डाऊन उठल्यानंतर नगर परिषदे मार्फत टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.

कर्जत नगरपरिषद हद्दित रस्ता रूंदीकरण झाल्या नंतर महावितरण कंपनीचे पोल हे रस्त्याच्या मध्यभागी आले हे पोल रहदारीस अडथळा होत होते, तर काही वर्षापूर्वी शहरात बसवलेले ट्रान्सफॉर्मर हे आता इमारतींना आणि नागरिकांना धोकादायक ठरू शकतात याचा विचार करून नगरपरिषद प्रशासनाने पहिल्या फेरीत महिला मंडळ शाळेजवळील ट्रान्सफार्मर, इद्रूस व्हिला येथील ट्रान्सफार्मर, गुंडगे रोड येथील एचटी लाईन पोल,एलटी लाईन पोल आणि ट्रान्सफार्मर यांच्या जागा बदलून ते अन्य ठिकाणी हटविण्याच्या कामास सुरुवात केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.