राजस्व अभियानाअंतर्गत उपक्रम
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार हे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशिल आहेत,नैसर्गिक आपत्ती असो,घरकुल योजना,निराधार योजना,अनेक उपाययोजना करून आदिवासी विकास साधण्यासाठी ते प्रयत्न करीतआहेत.उज्वल गॅस योजने अंतर्गत गॅस व शेगडी वाटप,रेशनकार्ड देणे अशा अनेक योजना त्यांनी राबविल्या आहेत,शासकीय योजना राबविण्यासाठी जातीच्या दाखल्याची अतिशय आवश्यकता आहे,त्यासाठी त्यांनी राजस्व अभियान अंतर्गत कातकरी उत्थान अभियान कार्यक्रम राबवून त्यांना जातीचे प्रमाणपत्र नुकतेच कार्यालयात वाटप केले.
या जातीच्या दाखल्याची गरज प्रत्येक योजनेसाठी असल्याने आदिवासी बांधवांनी त्यांचे आभार मानले.








Be First to Comment