टाकावू वस्तू पासून टिकावू वस्तू, पारंपरिक खेळ : शाळा बंद तरी कोरोना काळातही शिक्षण सुरुच
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
आज सर्वत्र कोरोनाचे संकट सुरू असताना सर्व शाळा सुद्धा बंद आहेत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.मात्र या पलिकडे विद्यार्थ्यांना अजून काही द्यावे या दृष्टीकोणातून विद्यार्थ्यांना शिक्षण समवेत टाकावू वस्तू पासून टिकावू वस्तू, पारंपरिक खेळ,शिकविले जात आहे.कोरोना काळात प्रथम शिक्षण संस्था’ अंतर्गत’ आणि ‘अप्लाईड मटेरियल’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘बाल विज्ञान शोधिका चिलठण’ अंतर्गत हसत-खेळत विज्ञान या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत मिळत आहे.यामुळे खालापुर ब्लॉकच्या जवळपास ३० गावांत हे उपक्रम सुरु आहे.
‘या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी, गावामध्ये स्वयंसेवकांच्या मार्फत शिक्षण त्यांच्या पर्यंत पोहचविले जात आहे.यासाठी वस्तीत / मोहल्ल्यात ग्रुप मध्ये उपक्रम सुरु केले जात आहे. स्वयंसेवकांना अगोदर झूम कॉल च्या साहाय्याने ट्रेनिंग दिले जाते व नंतर ते उपक्रम विद्यार्थ्यांन सोबत घेतले जातात, यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.त्यांच्या मध्ये नविन काही शिकण्याची कला विद्यार्थी आत्मसात करीत आहेत.या संस्थेकडून गावांमध्ये स्वयंसेवकांच्या मदतीने गावातील सुशिक्षित युवक-युवती तसेच आंगणवाड़ी सेविका यांचा स्वयंसेवक म्हणुन काम करण्यात सहभाग जास्त दिसून येत आहे.
प्रथम संस्थेचे सहकारी- विज्ञानमित्र गावातील लोकांशी फोन द्वारे तसेच शक्य तिथे स्वतः जाऊन संपर्क व चर्चा करुण या स्वयंसेवकांना तयार करत आहेत व हे युवक देखील मुलांच्या शिक्षणात पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
स्वयंसेवक व गावातील शाळेत जाणारी मुले यांचे व्हाट्सएप ग्रुप तयार करुन दररोज विज्ञान व गणित भाषा यांचे उपक्रम पाठवले जातात व मुले है उपक्रम करुण त्याचे व्हिडीओ व फ़ोटो ग्रूपवर शेअर करतात. तसेच ज्या विद्यार्थी मोबाईल नाही त्यांना या उपक्रमाचे कार्ड मिळावेत म्हणुन,गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रिंट मिळाव्यात यासाठी गावातीलच काही देणगीदारांकडून मदत मिळत आहे व विदर्थ्यांना या प्रिंट स्वयंसेवकांच्या मदतीने मिळत आहेत. अशा प्रकारे संस्थेकडून होणाऱ्या कामाचे कौतुक ग्रामस्थांकडून होत आहे व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत मिळत आहे.
‘बाल विज्ञान शोधिका चिलठण’ या विज्ञान केंद्राची सहकारी रणजीत वाघमारे, अश्विनी भगत, शिवाजी हिरडे, प्रणाली पाटिल व विजय चव्हाण यांचे सातत्याने मुलांच्या संपर्कात राहत आहे.








Be First to Comment