Press "Enter" to skip to content

धक्कादायक : पनवेल मध्ये एकाच नंबर प्लेट च्या तीन दुचाकी


ई चलनाच्या कारवाई नंतर समोर आली घटना… दोषी एक कारवाई दुसर्‍यावर

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

पनवेल शहर आणि वाशी एपीएमसी परिसरात वाहतूक विभागाने वाहतूक नियम मोडणार्‍या दुचाकी वाहणार कारवाई केल्या नंतर, एकाच नंबर प्लेट च्या तीन गाड्या नवी मुबई परिसरात फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार ई चलनाच्या कारवाई नंतर समोर आला आहे.

कारवाईचा दंड मूळ वाहनांच्या मालकाला आल्या नंतर हा सर्व प्रकार पुढे आला. मात्र या बाबत तक्रार करण्यासाठी मूळ वाहन मालक पोलीस ठाण्यात गेल्या नंतर, पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप वाहन मालक प्रकाश मोरे यांनी केला आहे.

प्रकाश मोरे असे या तक्रारदाराचे नाव आहे. मोरे हे पनवेल शहरातील रहिवाशी आहे. सध्या त्यांना या फेक ई चलनाच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. प्रकाश मोरे हे पनवेल शहरातील सोसायटी परिसरातील रहिवाशी आहे. त्याच्या मालकीची एक दुचाकी आणि एक चारचाकी अश्या दोन गाड्या देखील आहे. एमएच 46 एए 9666 नंबरची बुलेट प्रकाश मोरे यांच्या नावावर आहे. मात्र याच एमएच 46 एए 9666 नंबरच्या दुचाकी वर नवी मुबई वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी अनुक्रमे 14 डिसेंबर 2020 रोजी वाशी एपीएमसी परिसरात दुचाकी चालकांनी हेल्मेट घातले नसल्यामुळे ई चालना द्वारे कारवाई केली होती, या कारवाई चे चलन पनवेल शहरात राहणार्‍या प्रकाश मोरे यांच्या नावावर आले. आपण वाशी ला दुचाकी घेऊन गेलो नाही मग ही कारवाई कसली असा प्रश्‍न त्यांना पडला.

हा मेसेज मिळाल्या नंतर त्यांनी या गोष्टी कडे काना डोळा केला मात्र पुन्हा 25 एप्रिल 2020 रोजी पनवेल शहरात याच नंबर प्लेट च्या दुचाकीवर वाहन चालकाने हेल्मेट घातले नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी ई चालना द्वारे कारवाई केली. आणि या गाडीचा दंड देखील पनवेल शहरातील रहिवाशी प्रकाश मोरे यांच्या नावावर गेला. मोरे यांची एमएच 46 एए 9666 या नंबरची बुलेट आहे. मात्र वाशी आणि पनवेल शहरात गेल्या वर्ष भरात फिरलो नसल्याने ही कारवाई कशी झाली याची चौकशी प्रकाश मोरे यांनी केली असता हा धक्कादायक प्रकार त्याच्या समोर आला.

या नंबरच्या तीन गाड्या असल्याचे त्यांच्या समोर आले. वाशी येथे कारवाई झालेली दुचाकी ही क्टिवा आहे. आणि पनवेल परिसरात कारवाई झालेले दुकाची ही होंडा कंपनीची दुचाकी आहे. आणि माझी या नंबरची बुलेट आहे. या सर्व प्रकारामुळे प्रकाश मोरे हे भयभीत झाले आहे. या फेक दुचाकी चालकांनी काही गैर प्रकार केला तर त्याचा सामना मला करावा लागेल अशी भीती मोरे यांनी व्यक्त केली आहे. हा सर्व प्रकार समोर आल्या नंतर, या घटनेची माहिती प्रकाश मोरे यांनी पनवेल शहर पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रकार वाहतूक विभागाशी निगडित असल्याने, त्यांना तेथील पोलिसांनी कळंबोली वाहतूक विभागाकडे पाठवले, कळंबोली वाहतूक विभागा कडे गेल्या नंतर, तेथील पोलिसानी त्यांना सिडीबी वाहतूक विभागाकडे पाठवले. त्या मुळे संतप्त झालेल्या प्रकाश मोरे यांनी पोलीस विभागाच्या कार्यवाही वर संशय व्यक्त करत पोलीस कारवाई साठी चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी : प्रकाश मोरे, वाहन मालक
माझ्या बुलेट ला जो नंबर आहे त्या नंबरच्या दोन दुचाकी नविमुंबई परिसरात फिरत असल्याचे समोर या आल्या नंतर मला भीती वाटू लागलीय आहे. काही गैर प्रकार झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्‍न माझ्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत या नंबर प्लेट वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी करावी अशी मागणी प्रकाश मोरे यांनी केलीय आहे.



Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.