सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
माथेरान मधील सेंट झेवियर शाळेत शिक्षण घेऊन पुढे उच्च शिक्षणासाठी जर्मनीत जाऊन मास्टर ऑफ सायन्स या पदवी परीक्षेत माथेरान मधील माजी नगरसेवक तथा क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष विजय कदम यांचे सुपुत्र वेदांत कदम यांनी या पदवी परीक्षेत उत्तीर्ण होऊन माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
माथेरान सारख्या या दुर्गम भागात दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर जीवनात काहीतरी नवीन बदल घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे वेदांत कदम यांनी सातासमुद्रापार जाऊन जर्मनी येथे मास्टर ऑफ सायन्स या महत्वाच्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण होऊन माथेरानचे नाव सुध्दा सातासमुद्रापार नेले आहे त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment