जिल्हा परिषद सदस्य पद्ममाताई सुरेश पाटील यांनी ग्रामस्थांना दिले निधी मंजूर चे पत्र
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव हद्दीतील असलेल्या तलावाची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे मात्र या तलावाची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे किशोर नामदेव पाटील यांनी सातत्याने पुढाकार घेवून या ठिकाणी तलावाचे शुशोभिकरण करण करुन गणेश घाट बांधण्यात यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते.
यासाठी राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील यांच्याकडे वेळोवेळी या तलावाचे शुशोभिकरण करण्याचा पाठपुरावा केल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पद्ममाताई सुरेश पाटील यांच्या जिल्हा परिषद फंडातून माजगाव तलाव गणेश घाट बांधकाम साठी पाच लाख रुपयांच निधी मंजूर करण्यात आल्यामुळे सुरेश पाटील यांच्या कडून माजगांव ग्रामस्थांना या निधी मंजूर झाल्याचे पत्र देण्यात आले.
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव येथे तलाव असले तरी सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये त्यांची मोठी दुरावस्था निर्माण झाल्यामुळे येथिल ग्रामस्थांना हे पाणी वापरण्यास खूप समस्या निर्माण होत होत्या,या तलावाळा वर्षाचे बारा महिने पाणी असल्यामुळे ह्यांचा वापर विविध कामासाठी येथिल ग्रामस्थ करीत होते.त्याच बरोबर गुरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत होते. पाणी म्हणजे जिवन असे असले तरी सुद्धा पाणी काटकसरीने वापरावे किंवा जे पाणी दुषिद्ध होत असेल तर त्यांचे शुद्धीकरण करावे कारण जल है तो हम है या पंक्ती प्रमाणे या पाण्याचा योग्य वापर व्हावे.शिवाय या ठिकाणी गणेश घाट बांधल्यामुळे साहजिकच हे पाणी शुद्ध होइल त्याच बरोबर येथिल असलेला गाळ सुद्धा काढून या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजिन करण्यात येइल या विचारांतून किशोर पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा करत होते.
माजी आमदार, रायगड जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी,सुरेश भाऊ लाड ,राष्ट्रवादी नेते सुरेश पाटील,सभापती विश्वनाथ पाटील,नरेश पाटील,अदिचे या माजगांव तलाव गणेश घाट बांधण्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य लाभले,यावेळी सुरेश पाटील यांच्या कडून ग्रूप ग्राम पंचायत सरपंच गोपीनाथ जाधव,जयवंत पाटील,मच्छिंद्र पाटील,सुधाकर महाब्दी चंद्रकांत पाटील,विलास कांबळे अविनाश कांबळे ,रामचंद्र गायकवाड,जयेश पाटील, दिलीप काठवले,धनाजी पाटील आत्माराम काठवले,सुधाकर काठवले,नाथा काठवले,संजय पाटील, अशोक पाटील, बबन पाटील,नंदकुमार पाटील कैर,शरद ढवाळकर यांच्या कडे निधी उपलब्ध झाल्याचे पत्र देण्यात आले.








Be First to Comment