Press "Enter" to skip to content

तब्बल 13 गुन्हे दाखल : तिस-या डोळ्याची मोलाची मदत

खालापूरात दुचाकीच्या डिकितून 4 लाखाची रोकड लंपास करणारा पोलीसांच्या जाळ्यात

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

तालुक्यातील शिळफाटा येथून दुचाकिच्या डिकितून चार लाखाची रोकड  चोरून नेणारा अशोक कुमार गौरीपती कुंचाल (वय41,सध्या रा.ठाणे,मूळ चेन्नई) याच्या खोपोली पोलीसानी मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर तब्बल 13 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे उघडकिस आले आहेत.

8 डिसेंबरला मूर्तुजा दुस्ते(रा.हाळ खुर्द) यांनी  बँकेतून चार लाखाची रक्कम काढून दुचाकिच्या डिकीत ठेवली .त्यानंतर दुस्ते यानी दुचाकि त्यांच्या शिळफाटा येथील एसी फ्रिज रिपेरिंग दुकानासमोर उभी करून ठेवली होती.बँकेपासून पाळतीवर असलेल्या दोन चोरट्यानी दुस्ते कामात असल्याच्या पाहत डिकि बनावट चावीने उघडून त्यातील चार लाख रक्कम ठेवलेली पिशवी हातोहात लंपास केली.त्या भागातील सीसी टिव्हि तपासले असता दोन अनोळखी  इसम दुस्ते यांच्या डिकीतून रक्कम काढताना दिसून आले होते.तिस-या डोळ्याच्या मदतीने खोपोली पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर यानी तपासाला सुरवात केली.सपोनी साधना पाटील व पोलीस उपनिरिक्षक अमोल वळसंग यानी तपासचक्रे वेगात फिरवली.चोरट्यानी वापरलेली काळ्या रंगाची युनिकाॅन दुचाकि सीसी टिव्हित दिसत होती.त्या आधारे शिळफाटा खोपोली,कर्जत फाटा,नेरळ,वांगणी,बदलापूर,उल्हासनगर ते थेट कल्याण पर्यंत सीसी टिव्हिच्या आधारे  मागोवा घेत पोलीस पथक आरोपी अशोक कुंचालच्या घरी पोहचली.

सी सी टिव्हीतील चोरटा अशोक असल्याची खाञी पटल्यावर त्याच्या घराची झडती घेण्यात आली.झडतीत पोलीसाना 23मोबाईल,वीस बनावट दुचाकिच्या चाव्या,कटर तसेच चोरीचे साहित्य तसेच चार लाखाची रोकड सापडली.अशोक कुंचालला अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याच्यावर वाशी,सायन, भांडूप,कुर्ला, खारघर,कामोठे,तळोजा व मुंबई तसेच चेन्नईत  13 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.अशोकचे साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.गुन्ह्याचा उलगडा करण्यास पोलीस अधीक्षक अशोक दुधे,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,खालापूर उपविभागिय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर,सपोनी साधना पाटील,पोलीस उपनिरिक्षक अमोल वळसंग,पोलीस हवालदार राजेंद्र पाटील,विकास पाटील,पोलीस शिपाई सतीश बांगर ,कादर तांबोळी,दत्ताञय नलुके,जयेश कुथे यानी मोलाची कामगिरी बजावली.पोलीसांच्या कामगिरीचे सर्वञ कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.