
रिलायन्स फाउंडेशन विद्यालयाच्या सी.बी.एस.ई. च्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी राखली १००% निकालाची परंपरा
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षांमध्ये रिलायन्स फाउंडेशन विद्यालय नागोठणे या विद्यालयाने इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सी. बी. एस. ई. बोर्ड परीक्षेमध्ये विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या २४ तसेच दहावीची परिक्षा देणाऱ्या ७३ विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.
बारावीच्या परिक्षेचा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १३ जुलैला जाहीर करण्यात आला असुन यामध्ये कुमारी साक्षी संदीप सावंत हिने (९४.८ टक्के) गुण मिळवून शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कुमार मोहम्मद उझेर शेख (९४.२ टक्के) आणि कुमार सुमन स्वरूप कर्माकर (९२. ८ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे .
तर १५ जुलै रोजी जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात रिलायन्स फाउंडेशन विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. यामध्ये कुमार झैद अशफाक पानसरे याने ९६. ६% गुण मिळवून शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. कुमारी धनश्री नितीन माने आणि कुमार पियुष संतोष वाजे या दोघांनीही प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमार आशुतोष स्वैन याने ९४. ८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण ७३ विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थांनी ९० टक्केहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. ४६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणी तर एकूण ६९ विद्यार्थांनी प्रथम श्रेणी संपादन केली आहे’.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रिलायन्स् फाऊंडेशनच्या शैक्षणिक समितीचे अध्यक्ष व्ही. पी. जॉय, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे युनिटचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चेतन वाळंज तसेच विद्यालयाचे प्राचार्य अनुप शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उज्वल यशामध्ये शाळेचे प्राचार्य अनुप शुक्ला, उपप्राचार्या श्रीमती शंपा सरकार तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगून विद्यालयातील विद्यार्थी आणि पालकवृंदाने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.






Be First to Comment