Press "Enter" to skip to content

समाज कल्याण सभापतींनी अभ्यागत कक्षातच सुरू केले कार्यालय

समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांचे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात लक्ष्यवेधी आंदोलन ……

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत ।

रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केलंय . त्यांनी आपले दालन सोडून अभ्यागत कक्षात कार्यालय थाटले असून तिथंच लोकांची भेट घेतात .समाज कल्याण विभागाअंतर्गत अपंग कल्याण विभागाचे कार्यालय ज्या इमारतीत आहे ती इमारत मोडकळीस आली आहे .त्यासाठी चांगले कार्यालय उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भोईर यांनी अनेकदा प्रशासनाकडे केली मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले . त्यामुळे या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा पवित्रा घ्यावा लागला .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.