सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, साहित्य संगीत व संप्रदाय अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असणा-या शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी लेखक संदीप राक्षे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत संदिप राक्षे यांना शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्यक्षम अध्यक्ष लक्ष्मीकांत (दादा) खाबीया यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
लेखक संदिप राक्षे यांचे लिखाण वाखाणण्याजोगी आहे.त्याचे अनेक लेख,कथा, कविता , कादंबरी विविध प्रसिध्दी माध्यमांवर झलकत आहेत.अनेक प्रसंगावर लिखाण करण्याची त्यांना आवड आहे.तसेच चित्रपट सृष्टीतही त्यांच्या लेखणीला खुप महत्व आहे.लेखक संदिप राक्षे यांची शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment