सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । आदित्य कडू ।
अमितकुमार बॅनर्जी यांनी अलिबाग तालुक्यातील बांधण येथे स्थापन केलेल्या संपर्क बालग्राम या संस्थेत मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या व्यक्तीमत्व विकासाची जबाबदारी घेतली जाते.
बांधण येथील या संस्थेत १९९९ पासून संस्थेतील आणि आजूबाजूच्या समाजातील गरजू आणि गरीब मुलांना रोजगार मिळावा. आणि भविष्यात ती मुले कोणावरही अवलंबून राहू नये यासाठी संस्थेच्या प्रभारी अधीक्षक रेखा मोकाशी यांनी मुलांना रोजगार प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
वडखळ येथील platinum PC Solution यांच्या सहकार्याने संपर्क बालग्राम बांधण येथे गरीब व गरजू मुलांसाठी संगणक आणि त्याच्या संबंधित रोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. संपर्क बालग्राम मध्ये छोट्या कार्यशाळेनंतर सहभागी मुलींना प्रशिक्षण देऊन ललिता म्हात्रे ही कांदळेपाडा येथील मुलगी संपर्क बालग्राम आणि platinum pc solution यांच्या माध्यमातून तयार केलेल्या कोर्स मधून संगणक प्रशिक्षितझाली आहे.

अजूनही अशा अनेक मुलींना संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार असल्याचा मानस संपर्क बालग्राम बांधणच्या प्रभारी अधीक्षक रेखा मोकाशी यांनी व्यक्त केला आहे.








Be First to Comment