रायगड जिल्हा नाभिक संघाचा संकल्प
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
रायगड जिल्ह्यातील तरुण सलून व्यावसायिकांसाठी या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन शिबीर भरविणार असल्याचा संकल्प रायगड जिल्हा नाभिक संघाने केला असून या शिबिराचे उदघाटन कोकण विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे यांनी यावेळी जाहीर केले.
रायगड जिल्हा नाभिक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा कोलाड येथील जिल्हा समाज मंदिरात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याच सभेत हा निर्णय घेण्यात आला.
सभेपूर्वी समाजातील नुकत्याच दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर जिल्हा नाभिक समाजाचे संस्थापक कै. दिनाभाई मोरे व जिल्हा नाभिक समाज मंदिरासाठी चार गुंठे जागा देणगी स्वरूपात दिलेले दानशूर व्यक्तिमत्व कै. अनंत सपकाळ यांच्या फोटोचे अनावरण समाजमंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष दिलीपभाई टके यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या २ जानेवारी रोजी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे समाजाचे हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या पुण्यतिथी निमित्त अलिबाग तालुका समाजाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे तसेच समाजाच्या माध्यमातून दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाणार असून दिनदर्शिकेचे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवाना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समाजाचे अलिबाग तालुका अध्यक्ष वैभव मुकादम यांनी दिली.
तसेच दरवर्षी २ जानेवारी रोजी प्रत्येक तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्पही या सभेत करण्यात आला. या सभेत उर्वरित कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या रायगड जिल्हा नाभिक समाज संघ कार्यकारिणीच्या सभेत समाज मंदिर जीर्णोद्धार समिती अध्यक्ष दिलीपभाई टके, विश्वस्त बाळासाहेब टके, जनार्दन मोरे, अनिल पवार, सुनिल यादव, नारायण पवार, संतोष जाधव, अशोक खंडागळे, कार्याध्यक्ष सोपान मोहिते, सचिव महेंद्र माने, सहसचिव संतोष पवार, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पवार, खजिनदार योगेश शिर्के, लवाद कमिटी अध्यक्ष प्रविण खराडे, सल्लगार शेखर घाडगे, शामकांत नेरपगार, मंगेश शिर्के, राजू गुजर, गजानन इंदुलकर, कुडली पोलीस पाटील शांताराम पवार, रविंद्र टके, सुधाकर निंबाळकर, प्रवीण पवार, संजय सकपाळ, किशोर खंडागळे, अमित दिवेकर, अशोक पवार, केतन पवार, निलेश खंडागळे आदींसह जिल्ह्यातील समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
दरम्यान आज झालेल्या कार्यकारणी विस्तारामध्ये सल्लागार म्हणून शैलेश ल. रावकर, गजानन खराडे, सह सचिव सचिन दिवेकर, उपाध्यक्ष प्रमोद मुकादम, जिल्हा संघटक म्हणून रमेश रावकर, सिद्धेश पवार, जयेश जाधव, सचिन जाधव, पंचक्रोशी अध्यक्ष म्हणून राजेश पांडे, राकेश जाधव, विजय जाधव, किशोर कदम, जिल्हा सदस्य म्हणून दिनेश जाधव, किरण घाडगे, राम शिंदे, सुधाकर निंबाळकर, प्रशांत शिंदे, मनोहर शिंदे, संजय भोसले, राजू मोहिते आदींची निवड करण्यात आली.








Be First to Comment