सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
इनरव्हील क्लब कर्जत तर्फे नवरात्री मध्ये नवरात्री टास्क स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये नऊ दिवसांचे महत्त्व या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा आयोजित केली होती, याप्रसंगी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सीबीसी हॉल रॉयल गार्डन नुकताच पार पडला. याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्राची चौडिया,सचिव उत्तरा वैद्य, खजिनदार करुणा पराडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
इनरव्हील क्लब कर्जत तर्फे नवरात्री टास्क स्पर्धेमध्ये तीन नंबर काढण्यात आले, यामध्ये प्रथम दीपा देशमुख, द्वितीय मधुरा चंदन, तृतीय ज्योस्ना शिंदे तसेच दीपावली निमित्त रंगावली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रथम प्राची नगरकर, द्वितीय जयश्री पाटील, तृतीय दीपा देशमुख आणि चतुर्थ सुलोचना गायकवाड आणि करुणा पराडकर यांना देण्यात आले.
याप्रसंगी क्लबच्या सदस्या मोनिका बडेकर, सुरेखा मराडे, भाग्यश्री शेळके आदी उपस्थित होत्या.








Be First to Comment