Press "Enter" to skip to content

श्री ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

श्री कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 724 वा संजीवन समाधी दिना निमित्ताने यंदाही श्री माऊली निवास कर्जत येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ सोहळा समितीतर्फे कार्तिक वद्य एकादशी ते कार्तिक वद्य त्रयोदशी कालावधीत तिन दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पहिला दिवशी कार्तिक वद्य एकादशी सकाळी दत्तात्रय म्हसे व वनिता म्हसे यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची षोडशोपचारे महापूजा व महाआरती करण्यात आली.

दुसरा दिवशी कार्तिक वद्य द्वादशी सकाळी किरण उपासनी व कल्पलता उपासनी यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची षोडशोपचारे महापूजा व महाआरती करण्यात आली.

तिसरा दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन या दिवशी सकाळी किशोर जाधव व अंजली जाधव यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची षोडशोपचारे महापूजा व महाआरती करण्यात आली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिना निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर यावेळी घंटानाद करण्यात येऊन पाच सुवासिनींच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना औक्षण केले आणि नंतर महाआरती करण्यात आली.यावेळी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगातून कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चरणी प्रार्थना करण्यात आली आणि शांतीमंत्राचे पठण करण्यात आले.

वरील तिन्ही दिवशी संध्याकाळी श्री हरिपाठ आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीच्या अभंगाचे पठण व श्रवण करण्यात आले.स्थानिक महिला भाविकांचा या कार्यक्रमात सहभाग होता.

कार्तिक वद्य सोमवती अमावस्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली तर महानैवेद्य व महाआरती करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाच्या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

वरील तिन्ही दिवस कार्यक्रमामध्ये वनिता म्हसे, श्रीमती रत्नप्रभा जोशी, प्रभाकर केळकर, शुभदा मराठे, छाया पाठक, पुष्पा पाटील विजया सरोदे,विणा परांजपे, ज्योती डायरे, कुमुदिनी कार्ले या भाविकांचा सहभाग होता.
सर्व कार्यक्रमास श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीचे सहकार्याध्यक्ष वसंत सुर्वे, सचिव ज्ञानेश्वर तिवाटणे,खजिनदार संतोष वैद्य, सहचिटणीस सुदाम कार्ले,चंद्रकांत म्हसे,ओंकार दळवी, ज्ञानेश्वर बागडे,योगेश कुंभार,सीता वाघमारे, मंगल भगत उपस्थित होते.तर पूजेचे पौरोहित्य नरेंद्र जोशी यांनी केले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिना निमित्ताने श्री माऊली निवास येथे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी , नगरसेविका मधुरा चंदन यांच्या सह अनेक भाविकांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.