सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोना रोगा समोर आरोग्य यंञणा देखील निष्प्रभ झाली परंतु नागरिकानी नियमांचे पालन केल्यामुळे कोरोना अखेरच्या टप्प्यात आहे असे मत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यानी व्यक्त केले.औद्योगिक असोसिएशन खोपोलीच्या वतीने आरोग्य साहित्य वाटप प्रसंगी आमदार खालापूर येथे आले होते.
खालापूर प्राथमिक आरोग्य,बोरगाव आणि वावोशी उपकेंद्राला औद्योगिक असोसिएशन खोपोलीच्या पुढाकाराने गोदरेज,टाटा स्टिल यानी बेड , ऑक्सिमीटरसह रूग्णालयासाठी आवश्यक विविध उपकरण देण्यात आली.आमदार थोरवे यानी कारखान्याकडून होत असलेल्या मदतीमुळे गोरगरिब जनतेला चांगले उपचार मिळणार असल्याचे सांगितले.
तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी आरोग्य केंद्रात अनेक ञुटी असून रूग्णाना वेळेवर उपचार मिळावे यासाठी परिस्थितीत बदल करणे आवश्यक असल्याचे सांगत औद्योगिक असोसिएशनने आणखी मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, खालापूर नगरपंचायत उपनगराध्यक्षा शिवानी जंगम,खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष संतोष जंगम,माजी उपसभापती ऊमेश गावंड,आरोग्य अधिकारी प्रसाद रोकडे,अल्टा कारखान्याने व्यवस्थापक बाळासाहेब म्हाञेसह आरोग्य कर्मचारी,पंचायत समिती आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment