Press "Enter" to skip to content

जेष्ठ मृदुंगाचार्य रघुनाथ महाराज पाटेकर यांचा 80 वा वाढदिवस साजरा

वाढदिवसानिमित्त राजीप सदस्य किशोरभाई जैन यांनी दिल्या शुभेच्छा

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

ऐनघर पंचक्रोशी वारकरी संप्रदायाचे वैभव तामसोली गावचे सुपुत्र जेष्ठ मृदुंगाचार्य हभप रघुनाथ महाराज पाटेकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त राजीप सदस्य किशोरभाई जैन यांनी त्यांना शुभेच्छा व सदिच्छा भेट देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.

ऐनघर पंचक्रोशीत हभप रघुनाथ पाटेकर महाराज यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत या पंचक्रोशीत भक्तिमार्ग स्वीकारले त्यांनी त्यांच्या जीवन कार्यात कुटूंबाची जबादारी तसेच शेती व्यवसाय संभाळत त्या काळात वारकरी संप्रदायासाठी गावागावात गुरुवर्य महाराज यांच्या समावेत रोपटं लावलं भजन कीर्तन हरिपाठ प्रसंगी मृदुंग वादक म्हणून कोणतीही अपेक्षा न करता केवळ भगवंतांची सेवा करत आहेत. गेली ऐंशी वर्षाच्या कालखंडात आज देखील ते त्याच पद्धतीने पखवाज वाद्य वाजवत भजन अभंग गात आहेत कोकणात कलगी तुरा नाच मंडळ फेमस त्यामुळे या गावातील नाच मंडळाचे ढोलकी वाजक परंतु वारकरी संप्रदायाचे वारसा जोपासत आज ऐंशी वर्ष टिकवून नव्या पिढी समोर एक आदर्श निर्माण केले आहे.

गेली ऐंशी वर्षाची त्यांची कारकीर्द आणि एक आठवण म्हणून त्यांच्या कुटूंबियांच्या वतीने त्यांचा वाढदिवस अध्यात्मिक आणि धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आले.

यावेळी शिवसेना माजी रायगड जिल्हा प्रमुख तथा विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर भाई जैन.
रोहा तालुका पं समीती सदस्य संजय भोसले, विजय गोळे, मधुकर ठमके, पांडुरंग गायकर , महादेव मोहिते , तानाजी लाड , मनोहर सुटे ,रमेश साळुंखे ,चंद्रकांत गोफण, रामचंद्र कोंडे ,प्रविण कालेकर, उमाजी चव्हाण, यशवंत हळदे , दयाराम चव्हाण , घायले ,हभप रायगड भूषण पातेरे महाराज,हभप दगडू महाराज दळवी गुरुजी , मारुती महाराज कोलटकर , वाघमारे महाराज ,योगेश यादव , अशोक कदम, संदिप ढाणे, ऐनघर ग्रामीण बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी उपाध्यक्ष सतीश सुटे,सचिव प्रफुल कणघरे, मंगेश लाड,दत्ताराम तेलंगे,व सर्व सभासद तसेच ऐनघर पंचक्रोशीतील विविध स्तरांतील हित चिंतक व तामसोली ग्रामस्थांनी हभप रघुनाथ महाराज पाटेकर यांना शुभेच्छा देत रायगड भूषण व वारकरी संप्रदायाचे कोकण प्रांताध्यक्ष खांब पंचक्रोशीचे वैभव हभप मारुती महाराज कोलटकर यांच्या सुश्राव्य किर्तनरुपी सेवेतुन त्यांचे अभिष्टचिंतन करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.