सिटी बेल लाइव्ह / नागोठण (महेश पवार) :
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील एस.पी.जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या परिक्षेचा कला, वाणिज्य व शास्त्र या तिन्ही शाखांचा एकुण निकाल ९५.४४ टक्के लागला आहे. यामध्ये कला शाखेचा निकाल ९३.९० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.८१ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९८.७४ टक्के लागला असल्याची महिती प्राचार्य उल्हास ठाकूर यांनी दिली.
बारावीच्या परिक्षेत विज्ञान शाखेतील कु. सलमान जुबेर अधिकारी हा विद्यार्थी ८६.९२ टक्के गुण मिळवून संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. कुमारी संयुजा टिळक खाडे (८५.३८ टक्के) व कुमारी सिद्धी दयाराम गिजे (७८.१५ टक्के) यांनी विज्ञान शाखेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. वाणिज्य शाखेत कुमार हर्ष गणेश जाधव, प्रथम क्रमांक (७८.४६ टक्के), कुमारी मयुरी दिपक मढवी, द्वितीय क्रमांक (७९.८४ टक्के) तर कु. ओम बबन कदम, तृतीय क्रमांक (७२.७७ टक्के) हे विद्यार्थी यशस्वी झाले. तसेच कला शाखेत कुमारी भक्ती चंद्रकांत कुथे (७६.३० टक्के), कुमारी आकांक्षा परशुराम मोकल (७३.६९ टक्के) व कु. वैभव यलप्पा तळगीरे (६९.३८ टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन नरेंद्रशेठ जैन, प्राचार्य उल्हास ठाकूर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.






Be First to Comment