सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
कोरोना संकटात राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा यासाठी रक्तदानाचे आवाहनाला खालापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव (कुमार) दिसले आणि युवकानी प्रतिसाद देत 73 बाटली रक्त संकलित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवारांचा यांचा 80 वा वाढदिवस नुकताच पार पडला. रक्तदान करत युवकानी वाढदिवस साजरा केला.मंगळवारी खालापूर पंचायत समिती आवारात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घघाटन जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील,युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे,खोपोली शहर युवक अध्यक्ष अतुल पाटील,राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील,नंदकुमार पाटील,दिपक बोंदार्डे,राजा पारठे यांच्यासह पदाधिकारी,महिला,युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
यादरम्यान 73 रक्तदात्यांनी रक्तदान करून कर्तव्य बजावले.सर्वोदय रूग्णालय घाटकोपर यांचे डाॅक्टर व पथकाचे सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले.








Be First to Comment