Press "Enter" to skip to content

दाट धुक्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतुकीस अडथळा

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

वातावरणात सध्या मोठ्या प्रमाणात बदल घडत असल्याचे दिसुन येत आहेत. अवकाळी पाऊस सुरु असतानाच मंगळवारी पहाटे सगळीकडेच दाट धुक्याची चादर मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्याचप्रमाणे वातावरणात सुद्धा मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. पंरतु या पहाटेच्या दाट धुक्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा झाला होता.

पहाटेच्या सुमारास धुक्याचे प्रमाण येवढे होते की, वाहनचालकांना वाहने चालवतांना चार ते पाच फुट अंतरावरील काहीच दिसत नव्हते. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला किंवा कुठे पार्किंग दिसेल तेथे ऊभी केली होती. त्यानंतर जसजशे धुक्याचे प्रमाण कमी होत गेले तशी वाहतुक सुरळीत रित्या सुरु झाली. वातावरणातील होणा-या वारंवार बदलामुळे साथीच्या रोगांचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असुन नागोठणे येथील खाजगी तसेच सरकारी, सुकेळी येथिल जिदंल रुग्णालय रुग्णांनी फुल्ल झाल्याचे दिसुन येत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.