Press "Enter" to skip to content

कष्टकरीनगर येथे रक्तदान शिबीर संपन्न

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

महाराष्ट्रात व देशात कोरोना रुग्ण व इतर रूग्णांना रक्त पुरवठ्याची गरज भासत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्घव ठाकरें यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. यातच शरदचंद्रजी पवार यांचा ऐंशीवा वाढदिवसा निमित्ताने कष्टकरीनगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबीरास रक्त दात्यांनी चांगला प्रतिसाद देत.एकूण सोला जणांनी रक्त दान करून शिबीर यशस्वी केले. रक्तदान शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी पनवेल येथील श्री साई ब्लड बॅंकेचे सुनिल पाटील ,डॉक्टर प्रियंका,आतिश पाटील, चेतन चौधरी, रंजना शाहू,अलफान्जो यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कष्टकरीनगर येथे आयोजित केलेले रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ गायकवाड, राहूल आरडे,जनार्दन आटपाडकर,सुनील राठोड, विजय गायकवाड, विलास पाटील, विनोद कांबळे,सद्दाम मुल्ला,संदिप गायकवाड, अनिल कांबळे, अनिल जाधव आणि परिसरातील ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.