अखत्यारीत नसलेल्या रस्त्याखाली केबल टाकण्यास म्हसळा नगरपंचायतीने दिली परवानगी
सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
म्हसळा नगरपंचायत हद्दीत येणारा मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणार्या म्हसळा शहरातील लोणेरे-श्रीवर्धन मार्गावर वोडाफोन आयडिया या खाजगी कंपनीची ऑपटिकल फायबर केबल टाकण्यासाठी चक्क नगरपंचायतीने अठरा लाख चोविशे रुपये घेऊन परवानगी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
गुरुवारी रात्री बाजारातील मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरु असताना असताना शहरातील नागरिकांनी या खोद्कामाबद्दल माहिती घेतली असता हे काम वोडाफोन आयडिया या कंपनीची ऑपंटिकल फायबर केबल टाकण्यासाठी सुरु आहे असे कंत्राटदाराने सांगितले.मात्र केबल टाकण्याचे काम रस्त्याचा बाजूने न करता रस्ता खोडून सुरु असल्याने तेथे उपस्थित नागरिकांनी त्या कामाला विरोध करून काम थांबवले.मात्र कंत्राटदाराने शुक्रवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्थात पुन्हा का सुरु केल्याने शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते.मात्र याच वेळी बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता श्रीकांत गणगणे यांनी स्वतः येऊन हे काम बेकायदेशीर असल्याचे सांगत थांबवले.कंत्राटदाराने मी १८ लाख रुपये नगरपंचायतीला भरले असल्याचे सांगितले.यावेळी कार्यकारी अभियंता गणगणे यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे,नगरपंचायतीला परवानगी देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत काम थांबवले नाही तर गुन्हा दाखल होईल असे कंत्राटदाराला सांगून केबल साठी होणारे खोदकाम थांबवले.

चौकट- 1)शहरातील रस्ता खोडून फायबर केबल टाकण्याचा बेकायदेशीर कामाला संरक्षण देण्यासाठी म्हसळा पोलिसांचा फौजफाटा उभा होता.शहरातील नागरिकांचे म्हणणे सोडून पोलीस कंत्राटदाराचे ऐकत होते.यामुळे शहरातून पोलिसांविरोधात नाराजीचा सुरु उमटू लागला आहे.
2) म्हसळा नगरपंचायतने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यावर परवानगी देणे म्हणजे दुसऱ्याच्या मुलाला आपला मुलगा समजून जवळ घेतला जातो त्याप्रमाणे नगरपंचायतने परवानगी कोणत्या आधारे दिली यांची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.यासाठी नगरपंचायत मुख्याधिकारी उकिरडे यांची सुद्धा चौकशी व्हावी यासाठी लवकरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन देण्यात येणार आहे.:-अमूलकुमार भलगट.उपाध्यक्ष, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघटना,रायगड जिल्हा.
नगरपंचायत चे मुख्याधिकारी उकिरडे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यावर परवानगी कोणत्या आधारे दिली याबाबत माहिती विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांना भ्रमणध्वनी वर रिंग गेली मात्र त्यांनी जाणीवपूर्वक भ्रमणध्वनी उचलला नाही.तसेच म्हसळा येथील एका पत्रकार याने त्याना संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले की फोन करायची वेळ आहे का?








Be First to Comment