विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची जिद्द कायम रहावी यासाठी सातत्य राखण्याची गरज : मनीष नांदगावकर
सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
कोरोना विषाणूपासून विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा शिक्षण घेण्याची जिद्द कायम रहावी यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्य राखावी हीच भावना एन 95 मास्क वाटण्यामागे असल्याचे मनीष नांदगावकर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा उसरोली सरपंच मनीष नांदगावकर यांनी मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थी यांना मास्क वाटप कार्यक्रमात केले.

यावेळी बोर्ली सरपंच मतीन सौदागर,माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर, ग्रामपंचायत सदस्य चेतन जावसेन,शरद वरसोलकर, मनोहर भोपी,शिक्षक देवेंद्र पाटील,प्रकाश चव्हाण, नीलम अंबाजी,आदी उपस्थित होते.

मुलांचे आरोग्य कोरोना काळात सदृढ रहावे यासाठी स्वतः खबरदारी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी कोरोना काळात मास्क व सॅनिटाईझर वापरण्याचे व हात धुण्याचे, सुरक्षित अंतर ठेवण्याचे, आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनिष नांदगावकर यांनी केले.
यावेळी बोर्ली ग्रामपंचायत सदस्य चेतन जावसेन, यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रवीण चोगले यांनी प्रास्तविक केले.








Be First to Comment