सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील आंबेवाडी येथील युवक चित्रकार साक्षात प्रितम निशिकांत पाटील याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस प्रसंगी त्यांची चित्रक्रुती आपल्या कलेतून साकारल्याने त्याच्या या कलेचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.
चित्रकलेची लहानपणापासून आवड असणाऱ्या साक्षात याने चित्रकलेची कोणतीही परीक्षा अथवा डिग्री पुर्ण केलेली नसली तरी आपल्या मुलभूत गुणकौशल्याच्या जोरावर त्याने आतापर्यंत विविध विविध निसर्गचित्र, व्यक्तिचित्र आपल्या चित्रकला कौशल्यातून साकारले आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची हुबेहूब साकारलेली चित्रशैलीने सर्वांना आकर्षित केले आहे.तर साक्षात या चित्रशैलीचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.
साक्षात हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते निशिकांत पाटील व आंबेवाडी ग्रा.पं.माजी उपसरपंच प्रितम पाटील यांचा सुपुत्र असून भविष्यात आपल्याला चित्रकला क्षेत्रात अधिक चांगले करिअर करायचे असून त्याद्रुष्टीने माझे निकराचे प्रयत्न चालले असल्याची प्रतिक्रिया साक्षात याने आपल्या चित्रशैलीबद्दल बोलताना व्यक्त केली आहे.








Be First to Comment