पनवेल दिनांक 14 (वार्ताहर) आपल्या पहिल्या पत्नीला व कुटुंबियांना दुसऱ्या लग्नाबद्दल व त्यापासून झालेल्या मुली बद्दल सांगेन अशी वारंवार धमकी देत असल्याने त्याचा राग मनात धरून आरोपी पतीने कुठल्यातरी कडक व बोथट हत्याराने महिलेच्या डोक्यात मारून तिला जीवे ठार मारल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी प्रणित तुकाराम तरपे वय 33 वर्षे राहणार खांदा वसाहत याने मयत रजिया उर्फ प्रिया प्रणित तरपे वय 30 वर्षे राहणार अर्जून बिल्डींग, कोपरगाव, खारघर हिला ठार मारले. मयत रजिया वारंवार प्रणित याला आपल्या लपवलेल्या लग्नाबद्दल व तसेच त्यापासून झालेल्या मुलीबद्दल तुझ्या पहिल्या पत्नीला व तुझ्या कुटुंबियांना माहिती देईन असे धमकावत असे. याचा राग मनात धरून आरोपी प्रणित याने रजिया उर्फ प्रिया हिच्या डोक्यात जीवघेणा वार करून तिचा खून केला.
या गुन्ह्याची नोंद खारघर पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे करीत आहेत.






Be First to Comment