Press "Enter" to skip to content

आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते शैक्षणिक ॲप चे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. कु.आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या माध्यमातून व नागोठणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने नागोठणे विभागातील इयत्ता १० वी तील ५० विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेण्याच्या दृष्टीने आयडियल स्टडी अँपचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते भाई टके यांच्या निवासस्थानी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

याच दरम्यान विद्यमान खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजिलेल्या डिजिटल व्हच्युअल रँलीत (व्हिडीओच्या माध्यमातुन थेट संवाद) आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्यासह कार्यक्रमाचे निरीक्षक जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, हरिषशेठ काळे, डॉ. राजेंद्र धात्रक, विलास चौलकर, अनिलशेठ काळे, कृष्णाजी धामणे, नारायण भोईर गुरुजी, रियाजशेठ अधिकारी, बाळासाहेब टके, विनय गोळे, सचिन कळसकर, राजेंद्र शिंदे, जुगनशेठ जैन, निवास पवार, अकलाख पानसरे, दिलीपशेठ शहासने, सुनिल लाड, दिनेश घाग, दिलिप अवाद, तानाजी लाड, बिपीन सोष्टे,
पांडुरंग म्हात्रे, दिपेंद्र आवाद, सुजाता जवके, आशा शिर्के, अमिता शिंदे, प्रतिभा तेरडे, किशोरी सोष्टे, माधुरी सोष्टे, तन्वी हजारे, महेंद्र हंबीर, प्रकाश रेवाळे, रोहिदास हातनोलकर, मनोज टके, चेतन टके, अक्षय नागोठणेकर, धृव सोष्टे, केतन भोय, उमेर सांगाडे, ओमकार लाड, प्रविण पवार आदींनी सहभाग घेतला होता.

दरम्यान आपले नेते शरदचंद्र पवार साहेब उतुंग व्यक्तिमत्व असून त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आज आघाडी सरकारने यशस्वीरित्या वर्षपूर्ती साजरी केली आहे. जनसामान्यांच्या विकासासाठी पवार साहेब यांनी शतकमहोत्सवी वाढदिवस देखील साजरा करावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना असे यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे यांनी सांगितले.

शैक्षणिक अॅप वाटप कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना अध्यक्ष कु.अक्षय नागोठणेकर, नागोठणे शहर अध्यक्ष कु.केतन भोय, सचिव ओमकार लाड, प्रविण पवार यांनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.