सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
अनलाॅकनंतर पुन्हा सुरू झालेल्या लाॅकङाऊनच्या पहिल्या दिवशी खालापूर तालुक्यात 29 कोरोना बाधित रूग्णांची भर पङून चारशेचा टप्पा ओलांङला आहे. उपचारा दरम्यान दोन मृत्यू झाल्याने मृताचा आकङा 14 वर पोहचला आहे.खालापूर नगरपंचायत हद्दीत दोन रूग्ण,खोपोली नगरपरिषद हद्दीत 20 तर ग्रामीण भागात वासांबे 1,रीस 3,नवीन पोसरी 1,चौक 1,तुपगाव 1 अशा सात रूग्णांची भर पङली आहे.तालुक्यातील एकूण रूग्णसंख्या 414च्या घरात पोहचली असून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक 229रूग्ण असल्याने चिंता वाढली आहे.14पैकी 6 मृत्यू ग्रामीण भागात आहेत.






Be First to Comment