कळंबोली येथील मायाक्का देवी मंदिरामध्ये दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दैवत फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय आंधळे यांच्या संकल्प संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला . यावेळी त्यांना मंडळाचे सल्लागार बबनराव बारगजे यांचेही सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी श्री ज्ञानेश्वर घुगे अमोल बिनवडे सागर घुले, सुरेश गर्कळ, अतुल कोळकर इत्यादी तरुणांचा मोठा सहभाग होता. दैवत फाउंडेशन तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी किमान 250 बाटल्या रक्त जमा केले जाते. आतापर्यंत 500 च्या वरती रक्ताच्या पिशव्या जमा झालेल्या आहेत . पुढील आणखी काही दिवस हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर चालणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन अक्षय आंधळे व बबन बारगजे यांनी केले आहे.

लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोली मध्ये रक्तदान शिबिर.
More from रायगडMore posts in रायगड »






Be First to Comment