Press "Enter" to skip to content

उरण शिवसेनेतर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

केंद्र सरकारच्या पेट्रोल डीजल दरवाढी विरोधात तसेच भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानांचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना उरण शाखे समोर जमून आंदोलन केले.

सदर आंदोलन जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी जिल्हाप्रमुख व जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले.

यावेळी तालुका प्रमुख संतोष ठाकूर, संघटक बी. एन. डाकी, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, ममता पाटील, ज्योती म्हात्रे, सुजाता गायकवाड, हितेश म्हात्रे, पंस सदस्य दीपक ठाकूर, हिराजी घरत, नयन भोईर, निलेश भोईर, गणेश घरत, यांच्यासह उरण तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी,तालुका संघटक,उपतालुका प्रमुख,उपतालुक संघटक,विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख,महिला आघाडी च्या सर्व पदाधिकारी,युवा सेनेचे सर्व पदाधिकारी,शिवसेनेचे अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी,शिक्षक सेना,वाहतूक सेना,विध्यार्थी सेना तसेच शिवसेनेचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शाखा प्रमुख,उपशाखा प्रमुख व सर्व शिवसैनिक व सर्व युवा शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी शिवसैनिकांनी पंतप्रधान मोदी सरकार केंद्रीयमंत्री दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.