Press "Enter" to skip to content

अज्ञात मृतदेह सापडला

सुभाष पंजाब हॉटेल परिसरात इसमाचा आढळला मृतदेह

पनवेल, दि.12 (वार्ताहर)
सुभाष पंजाब हॉटेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे, उंची 4 फूट 4 इंच, रंग सावळा, अंगाने मध्यम, चेहरा उभट, नाक सरळ, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी काळी पांढरी वाढलेली असून त्याच्या अंगात लाल रंगाचा अर्ध बाह्यांचा टी-शर्ट व बारीक चेक्स असलेली हाफ पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक एल.बी.लोणकर यांच्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.