बोलेरो जीप देखील केली जप्त
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः
पनवेल तालुक्यातील खारपाडा टोल नाका येथे मुंबईकडे जाणार्या मर्गिकेवर महिंद्रा बोलेरो पिकअप जीप अडवून त्या गाडीतून गायी व बैलांच्या मासांची अवैधरित्या वाहतूक करणार्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गजाआड केले आहे. तर त्यांच्या इतर साथीदारांचा शोध कसून सुरू आहे.
पेण बाजूकडून महिंद्रा बोलेरो जीपमध्ये अवैधरित्या गायी व बैलांच्या मासांची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.नितीन बडगुजर, पो.उप.नि.सुनील कारोटे व त्यांच्या पथकाने टोल नाक्यावर सापळा लावून आरोपी मोहम्मद इम्तियाज अब्दुल रहिम शेख (27, चालक रा.गोवंडी), अनिस अमिनुद्दीन कुरेशी (43 रा.गोवंडी) व युसूफ इशाक कुरेशी (43 रा.गोवंडी) यांना बोलेरो जीपसह ताब्यात घेतले असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. गाडीत असलेले 1400 किलो वजनाचे मास व गाडी असा मिळून जवळपास 3 लाख 97 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पनवेल तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे.






Be First to Comment