

गणेश नगरमधील शिक्षकांनी पाली मढाळी रस्त्याची केली स्वच्छता व दुरुस्ती
परिसरात केले वृक्षारोपण
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुका पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेश नगर मधील सर्व शिक्षकांनी म्हणून गुरुवारी (दि.16)
मराठा समाज भवन ते गणेश नगर पर्यतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाणी काढून मार्ग मोकळा करून दुरुस्ती केली. पाली मढाळी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे तेथे पाणी साठल्याने येथून मार्ग काढणे अवघड होते. मात्र शिक्षक वर्गाने हे कौतुकास पात्र काम केले.
तसेच बाजूच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. अनेकजण आपला वाढदिवस बर्थडे पार्टी, मोजमस्ती, फिरायला जाणे आदी बेत आखून करतात परंतु सेवाभाव जपत श्रमदान करीत साजरा केलेला हा वाढदिवस सर्वाना प्रेरणादायी ठरतोय.
या श्रमदान मोहिमेत कमलाकर शिंदे, अनिल राणे, सुनिल भिलारे, कैलास म्हात्रे, जनार्दन भिलारे, नवनीत म्हात्रे, के. के. खानेकर, सुभाष चव्हाण, राजू बांगारे, संदेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, कमलाकार तांडेल, मोतीराम पौनिकर व धर्मा तांडेल आदी शिक्षक सहभागी होते.






Be First to Comment