१२ डिसेंम्बर २०२०.(उदय कळस)
खास.सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस ऑनलाइन पद्धतीने न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज च्या सभागृहात संपन्न झाला.या वेळी निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले ईकबाल धनशे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमास नगराध्यक्षा जयश्री कापरे,तालुका अध्यक्ष समिर बनकर,सभापती उज्वला सावंत,उपसभापती मधुकर गायकर,शहर अध्यक्ष रियाज घराडे माजी सभापती छाया म्हात्रे,पं. स.सदस्य संदिप चाचले,गटनेते संजय कर्णिक,चंद्रकांत कापरे,संतोष (नाना) सावंत,शेकापचे श्रीपत धोकटे, राष्ट्रिय काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष महादेव पाटिल, रायगड अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष नाजिम हसवारे,अंकुश खडस,माजी जि. प.सदस्या वैशाली सावंत,गणअध्यक्ष सतिश शिगवण,महेश घोले,तालुक्यातील सरपंच,पदाधिकारी मोठ्या आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ऑनलाइन वाढदिवस कार्यक्रमात गृहमंत्री ना.अनिल देशमुख,नाम.धनंजय मुंडे,नाम.जितेंद्र आव्हाड,खास.सुनिल तटकरे,नाम.हसन मुश्रीफ आदि मान्यवरांनी आदरणीय शरद पवार यांच्या ५५ वर्षाच्या राजकीय प्रवासाच्या आठवणी जागृत केल्या.तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी या ऑनलाइन कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.फोटो-आदरणीय शरद पवार यांच्या ८० व्या ऑनलाइन वाढदिवस कार्यक्रमास उपस्थित म्हसळा तालुक्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हितचिंतक मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment