Press "Enter" to skip to content

विद्यालयास सँनेटाइजर स्टँण्ड व अन्य साहित्याची भेट

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

माध्यमिक विद्यालय पढवण या विद्यालयाचे सहा.शिक्षक संजीव शेरमकर यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सँंनेटाइजर स्टँड व अन्य साहित्याची भेट दिली.

संजीव शेरमकर हे या विद्यालयातील एक उपक्रमशिल शिक्षक म्हणून ओळखले जातात.तर त्यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला सॅनिटाइजर स्टॅण्ड भेट देऊन आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.यापूर्वी त्यांनी दोनवेळा विद्यालय निर्जंतुकीकरण केले आहे.

विद्यालयास सँनेटाइजरची भेट देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक बळीराम चव्हाण ,श्री. साळुंके, महाजन, पवार ,भौड ,म्हस्के व सौ. भौड मॅडम तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी दरवर्षी ते आर्थिक व शैक्षणिक साहित्याची मदत करीत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.