Press "Enter" to skip to content

प्राचार्य धनाजी गुरव यांना जबर मारहाण

महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रचार्यपदाचा वाद पुन्हा चिघळला

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत ।

रायगड जिल्ह्यातील महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य पदाचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. या वादाला पुन्हा तोंड फुटलय. गेल्या 12 वर्षात पाच ते सहा वेळा प्राचार्य बदलले असुन अनेक वेळा हाणामारी झाली आहे.

या प्रकरणात बाबासाहेबांचे नातु आनंदराज आंबेडकर यांच्यावर देखिल हल्ला झाला होता. आता पुन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी गुरव हे महत्व पूर्ण बैठकी साठी कॉलेज च्या हॉल मध्ये बसले असता महेंद्र घारे नामक व्यक्ती आणि त्याचे 5 ते 6 साथीदार यांनी त्याच्यावर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला आणि त्यांना जबर जखमी केले त्यांच्यावर आता महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून आता या प्रकरणी शासनस्तरावरून हस्तक्षेप केला जावा व प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी जोर धरत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.