Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र थोरवेंचा विकास कामांचा झंझावात

वर्षपूर्तीच्या कार्यकाळात 74 कोटी 43 लाखाची विकास निधी मंजूर

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत खालापुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी महेंद्र थोरवे हे निवडून आल्यानंतर थोरवे यांनी आपल्या कार्यातून विकास कामांचा झंझावात लावला असून त्यांनी आपल्या एक वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात 74 कोटी 43 लाखाची विकास निधी मंजूर करीत अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत.

राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली.सत्ता स्थापन होऊन नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाले आहे, राज्याचे मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विराजमान झाल्यानंतर राज्यात असंख्य प्रलंबित कामे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मार्गी लागली असताना कर्जत - खालापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेच्या प्रयत्नांतून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागल्याचे पाहायला मिळत आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांनी वर्षभरात कार्यकाळात 74 कोटी 43 लाखाची विकास निधी मंजूर करीत यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग 14 कोटी, 2515 अंतर्गत निधी 4.72 कोटी, 3054 अंतर्गत निधी 0.74 कोटी, सामाजिक न्याय 1.50 कोटी, खोपोली नगरपरिषद 5.50 कोटी, कर्जत नगरपरिषद 6.90 कोटी, खालापूर नगरपंचायत 4.72 कोटी, माथेरान 10 कोटी, स्थानिक आमदार निधी 1.10 कोटी, आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र 7 कोटी, आदिवासी उपाय योजना 2 कोटी, रुग्णवाहिका 0.25 कोटी, आरोग्यविषयक सोयीसुविधा 0.25 कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना 15.75 कोटी अशी विकासात्मक कामे मार्गी लावल्याने आमदार थोरवेंचा विकास कामांचा झंझावात कर्जत खालापूरात पाहायला मिळत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.