Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेस राडा रोडा (डेब्रिज) प्रकल्पास शासकीय जागा मिळणार

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषदेस राडा रोडा (डेब्रिज) प्रकल्प उभरण्यास शासकीय जागा मिळणार असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. थोड्याच कालावधीत ही जागा नगरपरिषद कडे हस्तांतरित होणार आहे.

कर्जत नगरपरिषदेचा घनकचरा प्रकल्प नगरपरिषद हद्दीतील गुंडगे येथील सर्व्हे नं-60 सव्वा पाच एकर मध्ये आहे. या घनकचरा प्रकल्पाला लागून मौजे – गुंडगे येथील सर्व्हे नं -58 ही 53 गुंठे क्षेत्र असलेली सरकारी जमीन नगर परिषदेस C & D Waste राडा रोडा (डेब्रिज) कच-यासाठी प्रकल्प उभारणे कामी नगर परिषदेस मिळणेसाठी शासन कडे मागणी केली होती.

सदरची जमीन कर्जत नगर परिषदे कडे विना मोबदला वर्ग करण्यांत येणार आहे यासाठी सदर जागेची स्थळ पाहणी दि.10 डिसेंबर रोजी तहसिलदार विक्रम देशमुख, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केली. यापूर्वी या जागेची पाहणी कर्जत प्रांत वैशाली परदेशी -ठाकूर यांनी केली होती.

लवकरच सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन ही जागा नगर परिषदे कडे हस्तातंरीत होणार असल्याने मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.