माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या प्रयत्नाला यश !
सिटी बेल लाइव्ह । राकेश खराडे ।
मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या खासदार निधीतून व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रयत्नाने डोंगरी विभाग कार्यक्रम अंतर्गत निधीमधून सभामंडपाचे भूमीपुजन व नवीन व्यायाम शाळेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ११/१२/२०२० रोजी करण्यात आले.

उरणचे माजी आमदार तसेच रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते हे भूमीपूजन पार पडले. यावेळी व्यायाम शाळेसाठी नविन व्यायाम साहीत्याचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, उरण तालुकाप्रमुख संतोषशेठ ठाकुर,पनवेल उपतालुका प्रमुख थोरवे, केळवणे विभाग प्रमुख डाॅ.भरत घरत,साई शाखाप्रमुख रमाकांत (कांताशेठ) मोकल, केळवणे शाखाप्रमुख मारुती मोकल, सरपंच अश्विनी घरत,ग्रामपंचायत सदस्य जयश्री कोळी,युवासेना पनवेल उपअधिकारी विक्रांत घरत, केळवणे जिल्हापरिषद युवासेना अधिकारी स्वप्निल भोवड, केळवणे पंचायत समिती युवासेना अधिकारी आकाश मोकल,उप अधिकारी रोशन खामकर,संदिप धर्माजी घरत,विनोद ठाकूर, तानाजी कोळी, किसन ठाकूर, प्रकाश घरत, शिवसैनिक व युवासैनीक उपस्थित होते








Be First to Comment