सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
राजसाहेब ठाकरे यांच्या निर्देशाने मनसे रोजगार स्वयं रोजगार विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे रोजगार स्वयं रोजगार विभागाची महत्वाची बैठक मनसे राजगड कार्यालय येथे सरचिटणीस, उपाध्यक्ष, जिल्हा संघटक, उपजिल्हा संघटक, तालुका संघटक, शहर संघटक आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न झाली.
या प्रसंगी उरण तालुक्यात मनसेचे कार्य करणाऱ्या फुंडे गावातील रहिवाशी, मनसेचे कट्टर एकनिष्ठ ऍक्टिव्ह कार्यकर्ते समीर पंढरीनाथ म्हात्रे यांची वरिष्ठांच्या आदेशाने मनसे रोजगार व स्वयं रोजगार विभागाच्या उरण तालुका उपसंघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र राज्याचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या हस्ते देण्यात आले.

2008 साली उरण तालुक्यातील फुंडे गावचे मनसे शाखाध्यक्ष म्हणून समीर म्हात्रे यांनी काम केले तदनंतर मनसे टोलनाकाच्या महत्वाच्या आंदोलनात सहभाग घेतला. तेंव्हा त्यांना जेलही झाली. पक्षासाठी जेल भोगला. त्यानंतर मनसे मध्ये कार्यरत राहूनच त्यांनी विविध कामे केली. पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. पक्ष संघटना अधिक मजबूत, बळकट करण्याच्या दृष्टीने व बेरोजगारांना पक्षाच्या माध्यमातून मराठी स्थानिक भुमीपुत्रांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने समीर म्हात्रे यांची उरण तालुका उपसंघटक पदी नेमणूक करण्यात आल्याचे राज्य अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांनी सांगितले.








Be First to Comment