सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
उरण नगरपालिकेच्या नगरसेवकाला व त्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. आज सापडलेल्या १७ पॉजेटीव्हमध्ये त्यांचा समावेश असल्याची माहिती शासकीय यंत्रणेने दिली.
कोरोना कोविड विषाणूचा फैलाव आता वाढू लागला आहे. उरण शहरातही कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. उरण नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक व त्याच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे.
नगरसेवक व मुलाचा रिपोर्ट पॉजेटीव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तरी शहरातील जनतेने आपल्या सुरक्षेची खबरदारी स्वतः घेणे आवश्यक बनले आहे.
Be First to Comment