Press "Enter" to skip to content

प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मंचारी संघ व भारत मुक्ती मोर्चाचे संतोष घरत यांनी दिला पाठींबा

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त , नलिकाग्रस्त व स्थानिक भुमीपुत्रांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मंचारी संघ व भारत मुक्ती मोर्चाचे संतोष घरत यांनी मार्गंदर्शंन करुन ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला.आंदोलनकर्त्यांना भरभक्कम पाठिंबा देत मार्गंदर्शंन केल्याने आंदोलनकर्त्यांंत प्रचंड बल व उर्जां निर्माण झाल्याचे दिसून आले.

पूर्वी़ची आयपीएल व आताची रिलायन्स यांनी स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना 1287 प्रमाणपत्र दिले होते.यापैकी 601 प्राधान्य प्रमाणपत्र धारक,110 नलिकाग्रस्त व ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर एमआयडीसी चा शिक्का आहे.अशा सर्व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करुन त्यांना आजवरचा संपूर्ण पगार तसेच वार्षिक बोनस देण्यात यावा.कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन कायद्यानुसार त्वरीत वेतन देण्यात यावे.निलंबित कामगारांना तत्काल कामावर रुजू करून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी स्थानिक भुमिपूत्र , प्रकल्पग्रस्त,नलिकाग्रस्गस्त यांनी एकजुटीने हा लढा उभारला आहे.

दरम्यान 27 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास कामगार नेते तथा राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मंचारी संघाचे उपाध्यक्ष संतोष घरत,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय आस्कर,सुर्यंकांत कासे, बहुजन मुक्ती पार्टीचे पंढरीनाथ पाटील, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश आंग्रे, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे मिलिंद सालवी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चांचे जिल्हा उपाध्यक्ष समिर घासे,भारत मुक्ती मोर्चाचे राकेश मोरे आदींनी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.