Press "Enter" to skip to content

सराईत वाहन चोरांची दुक्कल पोलिसांच्या तावडीत

चोरीची 3 वाहने हस्तगत

पनवेल शहर पोलिसांनी कारवाई


पनवेल, दि.11 (वार्ताहर)

रिक्षा, मोटारसायकल यासारखी वाहने चोरणा़र्‍या दोन सराईत चोरट्यांना  पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. सुरज लक्ष्मण झावरे (19) आणि शोहेब सलीम पठाण (21) अशी या चोरट्यांची  नावे आहेत. त्यांनी पनवेल भागात केलेले तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकिस आले असून त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीच्या 2 ऑटो रिक्षा व एक मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.  
पनवेल भागातून गेल्या महिन्यामध्ये ऑटो रिक्षा चोरी झाल्याची घटना घडल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर  गुन्हा दाखल केला होता. चोरट्यांचा माग काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. या तपासादरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. गुन्हे संजय जोशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पो.हवा.आयरे, पो.ना.परेश म्हात्रे, पो.ना.विनोद पाटील, पो.शि.गर्दनमारे, पो.शि.परासुर, पो.ना.राऊत, पो.शि.खेडकर, पो.ना.चौधरी, पवार आदींच्या पथकाने गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवून आरोपी सुजर झावरे व शोहेब पठाण या दोघांना अटक केली. तसेच त्यांची अधिक चौकशी करुन त्यांनी पनवेल भागातून चोरलेल्या दोन ऑटो रिक्षा व एक मोटारसायकल हस्तगत केले आहेत. त्यामुळे या दोन्ही चोरट्यांकडून  वाहन चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने त्यांची कसुन चौकशी करण्यात येत आहे.  या प्रकरणात अटक करण्यात आलेले दोघे चोरटे सराईत गुन्हेगार असून ते अल्पवयीन असताना देखील त्यांच्यावर वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. वाहन चोरण्यात दोघे तरबेज असून चावी शिवाय वाहन चालु करुन अवघ्या काही मिनिटामध्ये ते वाहन चोरुन नेत असल्याचे तपासात आढळुन आले आहे. हे दोघेही वाहन चोरल्यानंतर ते कमी किमंतीत विकायचे. विकता न आल्यास पेट्रोल संपेपर्यंत चोरीचे वाहन चालवून रस्त्याच्या बाजुला सोडून द्यायचे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.