महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची रायगड जिल्हाध्यक्ष जितु पाटील व सचिव रुपेश पाटील यांनी घेतली भेट
सिटी बेल लाइव्ह / पेण(प्रशांत पोतदार) #
रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या पाश्वभुमिवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनमध्ये पेण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष जितु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यतील गोर गरिब,गरजूंना मदतीचा हात दिला तसेच आजही रक्तदाना पासुन समाजसेवेचे कार्य रुपेश पाटील यांच्या कडून करण्यात येत असल्याने रायगड जिल्ह्यात मनसेला नवि उभारी येत आहे. तरुण वर्ग हि रुपेश पाटील यांच्या कार्यावर खुश आहेत.लॉक डाऊन मध्ये जनतेच्या समस्या सोडण्यासाठी तसेच कोरोना काळात मनसेच्या माध्यमातुन लोकांना काय मदत कराता येईल याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेड येथील नगराध्यक्ष तथा मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची रायगड जिल्हाध्यक्ष जितु पाटील व जिल्हा मनविसे सचिव रुपेश पाटील यांनी भेट घेउन चर्चा केली.






Be First to Comment