Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्र्यांनी माथेरानच्या ११ क्ले पेव्हर रस्त्यांसाठी दिला २५ कोटींचा भरीव निधी

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरान न प हद्दीतील अत्यन्त बिकट अवस्थेतील रस्त्यांच्या कामांसाठी निधी प्राप्त व्हावा या करिता गेले ३ वर्ष सातत्याने प्रयत्न करत होत्या, मागील सरकारच्या कालावधीत जवळजवळ ६ वेळा सदर प्रस्ताव तत्कालीन सरकार दरबारी सादर करण्यात आले होते परंतु कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे नगराध्यक्षा यांनी पुन्हा एकदा आणि कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख राजेश कुचिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना जुलै 2019 मध्ये इ मेल द्वारे सम्पर्क साधून माथेरानच्या विकासासाठी निधी प्राप्त होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यासोबत आपल्या प्रमुख उपस्थित बैठक घ्यावी तरच माथेरान ला निधी प्राप्त होऊ शकतो अशी विनंती केली.

त्या ई मेल ला उध्दव ठाकरे प्रतिसाद देत दि 7 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई येथील बिकेसी येथील सोफिटेल या हॉटेल मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांचे सोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई, आणि राजेश कुचिक यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पक्षप्रमुख यांचे उपस्थितीत नव्याने प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री यांचे कडे देण्यात आले तरी सुद्धा माथेरान नगरपरिषदेला कोणताही निधी मंजूर करण्यात आला नव्हता.


८ नोव्हेंबर ला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या नंतर ताबडतोब ३ डिसेंबर २०१९ रोजी माथेरानच्या नगराध्यक्षा सावंत यांना स्वतः फोन करून ५ डिसेंबर २०१९ रोजी मंत्रालयात माथेरानच्या निधी साठी बैठक आयोजित केली आहे असे सांगितले.

त्याप्रमाणे ५ डिसेंबर २०१९ रोजी ऑलिंपिया मैदान पहिल्या टप्प्यात विकसित करणे करिता वैशिष्ट्य पूर्ण योजने अंतर्गत ६ कोटी आणि अंतर्गत क्ले पेव्ह रस्ते विकसित करणेसाठी नगरोत्थान सुवर्ण जयंती अंतर्गत २५ कोटी इतक्या भरीव निधीची तत्वतः मंजुरी देण्यात आली आणि इतर कामाचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले त्यातील वैशिष्ट्य पूर्ण योजनेचा ५ कोटींचा निधी २२ जून २०२० रोजी वर्ग करण्यात आला आहे आणि २५ कोटी क्ले पेव्हर रस्ते विकसित करणेसाठीची प्रशासकीय मंजुरी अध्यदेश ७ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. मा मुख्यमंत्री महोदय आणि पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माथेरानच्या विकासाबाबत विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

हा निधी प्राप्त होणेसाठी कर्जत खालापूर आमदार महेंद्रसेठ थोरवे यांचा पाठपुरावा आणि विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, रायगड जिल्हा महिला आघाडी सम्पर्क प्रमुख तथा महापौर मुंबई किशोरी पेडणेकर खासदार अप्पासाहेब बारणे, जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, विधानसभा समनव्यक राजेश कुचिक, महिला आघाडी रायगड संघटक रेखाताई ठाकरे ,तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी, तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे तसेच उपनगराध्यक्ष, सर्व सन्मानीय नगरसेवक/नगरसेविका, मुख्याधिकारी मा डॉ प्रशांत जाधव यांचे सहकार्य लाभले.

माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमतः एवढा मोठा निधी मंजूर करण्यात आला असून मा मुख्यमंत्री महोदय यांच्या एक वर्षेच्या आघाडीच्या कालावधीत जवळजवळ ३७.५ कोटींचा निधी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेस पाठपुरावा करुन मंजुरी आणण्यात माथेरान च्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा प्रसाद सावंत ह्यांनी कर्जत खालापूर चे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार आप्पा बारणे यांच्या सहकार्याने यश मिळवले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.