सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
जेएनपीटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शिवसमर्थ स्मारकाजवळ लावण्यात आलेला ध्वजाची उंची कमी असून तो कमीत कमी ३३मीटर इतक्या उंचीचा असावा अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष राजेश कोळी यांनी केली आहे.
जेएनपीटीने एक वर्षांपूर्वी जासई दास्तानफाटा येथे भव्यदिव्य अशा शिवस्मारकाची उभारणी केली आहे. या शिवस्मारकाजवळ जो ध्वज लावण्यात आला आहे. त्याची उंची कमी असून स्मारकाला साजेशा असा भव्यदिव्य ३३ मीटर उंचीचा शिवध्वज उभारण्यात यावा अशी मागणी जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांच्याकडे मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष राजेश कोळी यांनी केली आहे.








Be First to Comment