सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
रुग्णाच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत करणार्या परिचारकांवर कळंबोलीतील सत्यम हॉस्पिटल मधील डॉक्टर अत्याचार करीत असून अनेक पीडित परिचारकांना नोकरीवरून काढून टाकायच्या धमक्या देत अत्याचार सुरु आहेत. सत्यम हॉस्पिटल मधील डॉक्टर अमरेंद्र यादव हे सत्यम हॉस्पिटल मधील अनेक परिचारिकांना लज्जा उत्पन्न होईल असे वागवून अत्याचार करीत होता.
या विषयी अनेक परिचारिकांनी डॉ यादव करीत असलेल्या अत्याचाराची माहिती डॉक्टर हिमा बरनवाल व डॉ बिंदू बरंनवाल याना दिली असून हि त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे डॉ यादव ची हिम्मत वाढत जाऊन येथील अनेक परिचारिकांना त्याचा त्रास होऊ लागला अखेर एक परिचारिकीने हिम्मत दाखवून कळंबोली पोलीस ठाण्यात डॉ अमरेंद्र यादव विरोधात विनयभंग अत्याचाराची तक्रार केली असून वपोनि सतीश गायकवाड यांनी त्याची दखल घेत डॉ अमरेंद्र यादव विरोधात भा .द. वि. कलाम 354 ,500 अन्वये कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
कळंबोलीतील डॉ .बरनवाल यांचे सत्यम हॉस्पिटल असून या हॉस्पिटल मध्ये अनेक परिचारिकांना या हॉस्पिटल मधील डॉ. अमरेंद्र यादव हे सतत त्रास देत असत येथील परिचारिकांच्या हॉस्टेल मध्ये रात्री अपरात्री जाऊन अनेक परिचारिकांना नाहक त्रास देत अश्लील हावभाव ,बोलणे करून त्याच्या मनाप्रमाणे न केल्यास नोकरीवरून काढून टाकायच्या धमक्या देत असे त्यामुळे अनेक परिचारिका त्रासलेल्या होत्या याविषयी ची सर्व कल्पना डॉ बिंदू बरनवाल याना परिचारिकांनी देऊन देखील त्या डॉ वर कोणतीच कारवाई केली गेली नाही येथील अत्याचाराला कंटाळून एका परिचारिकेने हिम्मत दाखवत कळंबोली पोलीस ठाण्यात डॉ. अमरेंद्र यादव विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
डॉ अमरेंद्र यादव याला पाठीशी घालणार्या डॉ बिंदू बरंनवाल व डॉ बरनवाल यांच्यावर हि अमरेंद्र यादव ला साथ दिली म्हणून गुन्हा दाखल करावा अशा येथील परिचारिका खाजगीत बोलत आहेत. यांच्या धाकाला घाबरून अनेक परिचारिका कुठेही अत्याचाराची वाच्यता करीत नव्हत्या.








Be First to Comment